बारबालांना टिप देता येईल..मात्र पैसे उधळता येणार नाहीत; वाचा डान्सबारबाबतचे नियम

0
1598

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – डान्सबारमध्ये बारबालांना टिप देता येईल. मात्र, त्यांच्यावर नोटा आणि नाणी उधळता येणार नाहीत. तसेच डान्स बारमध्ये मद्य आणि ऑर्केस्ट्रा चालवण्यासही परवानगी. बार आणि डान्स फ्लोअर वेगळे ठेवण्याची गरज नाही. डान्स स्टेज आणि खाण्यापिण्यासाठी वेगळ्या जागा असू शकत नाहीत.

मुंबईसारख्या भागात धार्मिक व शैक्षणिक संस्थांपासून एक किलोमीटरच्या परिसरात डान्स बार नसण्याची अट टाकणे हे घटनाबाह्य आहे. यामुळे कोर्टाने ती रद्द केली. स्वच्छ चारित्र्याची व्याख्या करणे अशक्य. यामुळे अशा लोकांनाच डान्स बार सुरू करण्याचा परवाना द्यावा ही अटही रद्द.

मुंबईत संध्याकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत डान्स बार सुरू राहतील. डान्स बारमध्ये अश्लीलतेविरुद्ध ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायम. बारबालांचे वेतन ठरवण्याचे काम सरकारचे नाही. हा तर बारबाला व मालकांतील कराराचा मामला आहे.

बारमध्ये बारबालांच्या नाचण्याचा भाग आणि ग्राहकामध्ये भिंत नसेल. स्टेज आणि ग्राहकांमध्ये ५ फुटांचे अंतर ठेवण्याची अटही रद्दबातल. बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भंग होतो. यामुळे सीसीटीव्हीची अट रद्द.