पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नाना शेजवळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

0
933

पुणे, दि. ९ (पीसीबी) – इनोवेशन सोसायटी ऑफ इंडिया, सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे आणि कोमनवेल्थ व्होकेशनल युनिवर्सिटी जॉर्जिया यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार २०१८” , ऑल इंडिया शिवाजी मेमोरिअयल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नाना एन. शेजवळ यांना प्रदान करण्यात आला. आज (मंगळवारी) मुंबई येथील हॉलिडे इन हॉटेल येथे हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

समाज्याच्या आणि देशाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवून निरोगी आणि सुसंकृत समाजाची निर्मिती करणारा समाजातील शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा या उदेशाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. डॉ. शेजवळ हे महाविद्यालयातील एन.एस.एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. तसेच उन्नत भारत अभियानचे नोडल ऑफिसर  म्हणून कार्यरत आहेत. एन.एस.एस मार्फत त्यांनी ग्रामीण विकासामध्ये योगदान दिले. पानशेत जवळील रुळे या गावातील शाळेतील विद्यार्थांसाठी विविध कार्यक्रम पूर्ण केले. ज्यामध्ये संगणक प्रशिक्षण, इंग्रजी स्पिकिंग कोर्स, संगणक प्रिंटर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशिक्षण दिले. शिवाय, दोन बंधारे बांधून पाण्याचा प्रश्न सोडवला.

तसेच गावाच्या गटारी साफ करून स्वच्छता अभियान राबविले. आणि वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे सिमेंट कॉंक्रीटचा शाळेसाठी रस्ता तयार केला. डॉ. नाना शेजवळ यांनी दोन पीएच.डी पदवी प्राप्त केल्या असून अनेक संशोधन निबंध उच्च प्रतीच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले आहे. संशोधन प्रोजेक्ट पुणे विद्यापीठाच्या आर्थिक सहकार्य घेऊन पूर्ण केला असल्याचे सांगितले जाते.