पुणे रेल्वे स्थानकावर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकावर गोळीबार; दिवसभरातील तिसरी घटना

0
2584

पुणे, दि. २१ (पीसीबी) – पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफोर्म क्रमांक तीनवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या गोळीबार केला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास घडली.

या घटनेत पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आज पहाटे चंदननगर येथील अनुजा भाटी या महिलेवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींनीच पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर गोळीबार करुन फरार झाले असल्याचे बोलले जात आहे. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान पुणे शहरात गोळीबारीची ही आज दिवस भरातील तिसरी घटना आहे. आज दुपारी येवलेवाडी भागातील गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार अज्ञातांनी दुकानातील कामगारावर गोळीबार करुन फरार झाले आहेत. एकाच दिवसात गोळीबाराच्या तीन घटना घडल्याने पुणे शहर परिसरात भितीचे वातावरण आहे.