पुणे रेल्वे स्टेशनला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्याने खळबळ

0
923

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) सकाळी रेल्वे व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून टाकीतील पाण्याची तपासणी करताना हा प्रकार घडकीस आला.

मृताची ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे ५० असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास रेल्वे व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पाण्याच्या टाकीची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये अंदाजे ५० वर्ष वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती रेल्वे पोलिस स्थानकाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या मार्फत मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदणासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

दरम्यान, संपूर्ण रेल्वे स्थानकाला या पाण्याच्या टाकीमधून पिण्याचे पाणी पुरविले जात होते.