पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले

0
202

देहूरोड, दि. २ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावर एका कंटेनर चालकाला लुटल्याची घटना रविवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजता देहूरोड जकात नाक्याजवळ घडली.

रमेश आदिनाथ नागरगोजे (वय 30, रा. कळंबोली, नवी मुंबई. मूळ रा. वडगाव, ता. पाथर्डी, अहमदनगर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंटेनर चालवण्याचे काम करतात. ते रविवारी रात्री जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना देहूरोड जकात नाक्याजवळ आले असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकी कंटेनरला आडवी लावून कंटेनर थांबवला. त्यानंतर कंटेनरमध्ये घुसून फिर्यादी यांना मारहाण करून फिर्यादीकडील तीन हजार रुपये, 10 हजारांचा एक मोबाईल फोन, ब्ल्यूटुथ हेडफोन असा एकूण 13 हजार 500 रुपयांचा चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.