पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात; ट्रकमधील ड्रम फुटल्याने उडाला आगीचा भडका

0
248

लोणावळा, दि.१० (पीसीबी) : पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने लेन क्रॉस करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला त्याची धडक बसली. आणि दुर्दैवाने या धडकेत दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या धडकेमध्ये ट्रकमधील ड्रम गरम होऊन फुटले व आग लागली. दरम्यान त्यांचा ब्लास्ट होऊ लागल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणेला पहाटेपर्यंत प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत त्या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पहाटेच्या सुमारास अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या अपघातामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला असून खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असल्याने घटनेची माहिती समजताच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या टीमसह आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, अफसकॉन कंपनी, यावेळी मदतकार्यासाठी पुढे आले.