पुणे पोलीस डी.एस.के प्रकरणातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधात दाखल गुन्हे मागे घेणार

629

पुणे, दि. १९ (पीसीबी) –  पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी कर्ज प्रकरणी अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे पोलीस शनिवारी (दि.२०) पुणे सत्र न्यायालयात तसा अर्ज दाखल करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज देत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यात बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे, बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता आणि झोनल मॅनेजर नित्यानंद देशपांडे या तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत. मात्र आता पुणे पोलिसांनी हे गुन्हे मागे घेत त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रने डी. एस. कुलकर्णी यांना १०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, त्या व्यतिरीक्तही त्यांना नियमबाह्य पद्धतीने १० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला होता.