पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागांवर राष्ट्रवादी दावा करणार  

0
542

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली.  पवार यांनी राज्यातील १७ जिल्ह्यांचा आढावा घेतला. राज्यातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे २५ जागांची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, हातकणंगले, जालना या जागा राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्या आहेत.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागा देण्यास तयारी दाखवली आहे. तर राष्ट्रवादीला काँग्रेसकडून परभणी आणि अमरावती या जागा बदली करून हव्या आहेत. २०१९ ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान,  मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. यामुळे पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.