पी. चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षणासाठी २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

0
478

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – आयएनएक्स मीडिया प्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षणासाठी २८ सप्टेंबरपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी त्यांना न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.  त्यामुळे चिंदबरम् यांनी दिलासा मिळाला आहे.

याप्रकरणी १९ जुलै रोजी सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये पी. चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात सहआरोपी केले होते. तर  इतर १६ जणांनाही सह आरोपी केले आहे.  यामध्ये विद्यमान आणि निवृत्त सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, २ जी स्पेक्ट्रम घोटाळा समोर आल्यानंतर  एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले होते. यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून  मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला एअरसेल या टेलिकम्युनिकेशन कंपनीत गुंतवणुकीसाठी बेकायदा परवानगी दिली होती.