पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला चिखलीतून तर त्यांच्या साथीदाराला आकुर्डीतून अटक

0
887

चिखली, दि. २० (पीसीबी) – पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला चिखलीतून तर त्याच्या साथीदाराला चिखलीतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेकडील खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने आज (मंगळवारी) केली.

संतोष दशरथ झावरे (वय ४२, रा. सिध्दी हाईट्स फ्लॅट नं. ७, पंतनगर, लेन क्र. १, जाधववाडी, चिखली) आणि त्याचा साथीदार समाधान विनायक भदाणे (वय २७, रा. व्दारा अरविंद सोळंकी यांच्या बिल्डींगमध्ये, इंद्रायणी पॅलेस, दत्तवाडी, आकुर्डी, मुळ, रा. मंगळुर जिल्हा जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुन्हे शाखेकडील खंडणी आणि दरोडा विरोधी पथक पिंपरी आणि चिखली पोलीस ठाणे हद्दी मध्ये अॅन्टी चेन स्नॅचिंग, रोड रॉबरी या गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा म्हणून गस्त घालत होते. यावेळी पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल रुक्मिनी मंदिराजवळ एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. यावर विठ्ठल बढे यांनी स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी सापळा रचला आणि आरोपी संतोष झावरे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन संतोष याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ती पिस्टल आकुर्डीतील त्याचा मित्र समाधान भदाणे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन समाधान याला देखील अटक केली. या दोघांवरही चिखली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे तसेच पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोख दुधवणे, महेश खांडे, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, उमेश पुलगम, शरिफ मुलाणी, किरण खेडकर, निशांत काळे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश कोकणे, आशिष बनकर, प्रविण माने, गणेश हजारे आणि नितीन खेसे यांच्या पथकाने केली.