पिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
660

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – सायकल विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून त्यातील ३७ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी दहाच्या सुमारास नावीचार शिवरामनगर येथील सायकलच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक सतनाम सिंग अवतारसिंग भोगल (वय ६३, रा. नावीचर रोड, शिवराम नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतनाम सिंग यांच्या भावाचे शिवरामनगर, पिंपळे गुरव येथे सायकल विक्रीचे दुकान आहे. त्यांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील तब्बल ३७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी यांचे भाऊ दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.