वादग्रस्त श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीत २ हजार मतांनी विजयी 

0
1726

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) –  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम   अहमदनगर महापालिका निवडणुकीत  प्रभाग  क्रमांक ९ मधून  २ हजार पेक्षा  अधिक मते  घेऊन विजयी झाला आहे. विशेष म्हणजे छिंदमने भाजप उमेदवार प्रदीप परदेशी याचा पराभव केला आहे.

माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर  त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची भावना व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर  त्याची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.  नगर महापलिका निवडणुकीत त्यांने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला आहे.

छिंदम हा प्रभाग क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवार  म्हणून रिंगणात होता. त्याच प्रभाग क्रमांक ९ मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त विधान केल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही छिंदमने निवडणुकीत २ हजारच्या मताधिक्याने विजय मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.