पिंपळेसौदागरमध्ये विठाई मोफत वाचनालय; आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते उद्घाटन

0
923

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – उन्नती सोशल फौंडेशनमार्फत पिंपळे सौदागरमध्ये विठाई मोफत वाचनालयाची सुरूवात करण्यात आली. त्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वाचनालयात मराठी, हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल १५०० हून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

माणूस हा पुस्तकांमधूनच घडतो. त्यामुळे पुस्तकेच काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी वाचनालयामध्ये असलेली पुस्तके व त्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रदीप कदम यांचे व्याख्यान झाले.

यावेळी नगरसेवक शत्रूघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, डॉ. गिरीश प्रभुणे, यशदा रिऍलिटी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, ग्रॅव्हिटी लॅन्डमार्क्सचे चेअरमन राजू भिसे, विजय भिसे, आनंद हास्य क्लबचे सर्व सभासद, ऑल सिनियर सिटीझन अससोसिएशन चे सर्व सभासद, नवचैतन्य हास्य क्लबचे सर्व सभासद , पिंपळे सौदागर येथील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे-पाटील यांनी केले. नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.