पिंपळेसौदागरमधील राधाई सोसायटीतील कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाचे नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन

0
438

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – ग्रीन पांडा एन्व्हायरो सिस्टिम्स लिमिटेड मार्फत पिंपळेसौदागर येथील राधाई नगरी सोसायटीमध्ये १०२ सदनिकांमधील ओल्या कचऱ्यांपासून ६० किलो क्षमतेच्या कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्पाचे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते रविवारी (दि. २७) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन विवेक फलक, सेक्रेटरी डॉ. दिपाली गायकवाड, खजिनदार केतन शहा, पिंपळे सौदागर विभागाचे आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, ग्रीन पांडा एन्व्हायरो सिस्टिम्सचे पार्टनर गणेश शिंदे, सौरभ पुरोहित, विजय देशपांडे, शंकर हांडे, उज्वल देशपांडे, संजय होने, पराग देशमुख, प्रतिभा शर्मा, संकेत गुप्ता, राहुल गायकवाड, रितु गायकवाड, कविता पानघंडी, संध्या पानघंडी, अपर्णा कुलकर्णी, वैशाली शहा, पौर्णिमा श्रॉफ, विजय श्रॉफ, प्रमोद कुलकर्णी, वसुंधरा देशपांडे, रूपाली जैन, सोनम जैन, रमेश काटे, किरण जैन, राहुल जैन, किशोर देशमुख, मोघल, संजय शेलार, मनोज खोटले, लातूरकर, प्रशांत सावंत, पंकज सावेकर आदी उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “पिंपळेसौदागरची स्मार्ट सिटीसाठी करण्यात आलेली निवड ही पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभागातून व योगदानमार्फत योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत बरोबरीने ओला कचरा विल्हेवाट या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेला करत असलेल्या या अमूल्य सहकार्याबद्दल तसेच जनजागृतीबद्दल विशेष आभार मानतो.

स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते, तर ती सुविधा भोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते. पिंपळे सौदागरवासीयांनी हा स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखवला आहे. पिंपळेसौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प राबविण्यात आले आहे. परिसरातील इतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थांनी देखील अशाच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावेत. तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डनमध्ये वापर करता येईल. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.