भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या पुढे गेल्यास मोठा धोका – रामदेव बाबा

0
362

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारताची लोकसंख्या  झपाट्याने वाढून १३० कोटींच्या घरात पोहोचली आहे. पुढील ५० वर्षांत भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या पुढे जाता नये, अन्यथा मोठ्या समस्या निर्माण होऊन धोका निर्माण होईल, असा इशारा योगगुरु रामदेव बाबा यांनी दिला आहे.

भारताची लोकसंख्या १३० कोटींवर गेली आहे. यामुळे लोकांना सोई सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येला सोई पुरविण्याची क्षमता आपल्या देशाकडे नाही. त्यासाठी  लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी कायदा करावा लागेल, असेही रामदेव बाबा म्हणाले.

नवीन कायदा करून तिसऱ्या अपत्याचा मतदानाचा हक्क काढून घेता येईल. तसेच त्याच्यावर निवडणूक लढविण्यासही बंदी घालावी आणि त्याला सर्व सरकारी फायद्यांपासून मुक्त ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. चीनलाही लोकसंख्यावाढीची समस्या भेडसावत आहे. यामुळे तेथे एकच अपत्य बंधनकारक  करण्यात आल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.