पिंपरी मेन बाजार पेठेत लागली आग; कपड्याचे आणि चष्म्याचे दुकान जळून खाक झाले

0
439

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) : शॉर्टसर्किट मुळे आग लागून पिंपरी मेन बाजारपेठेतील १ कपड्याचे आणि चष्म्याची २ दुकाने जळून खाक झाली आहेत. दुपारी अकराच्या सुमारास ही आग लागली.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार बंबानी तासाभरात आग विजविण्यात यश आले. कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाले. नेहमी गर्दी असते, पण कोरोनामुळे बाजार पेठ बंद असल्याने आग विजविणे सोपे झाले.