काळेवाडीमध्ये पोलिसांना मारहाण – तिघांवर गुन्हा दाखल

0
453

वाकड, दि. २८ (पीसीबी) – काळेवाडी परिसरात पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार (दि. २७) रोजी घडली असून युसून गुलाब आत्तार (वय५०), मतीन युसून आत्तार (वय २८), मोईन युसून आत्तार (वय २४) राहणार भारत माता चौक, काळेवाडी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई शंकर विश्वंभर कळकुटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिस शिपाई शंकर कळकुटे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. ते सोमवारी काळेवाडी परिसरात काम करत आसताना यावेळी आरोपी युसू, रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसले. त्यामुळे कळकुटे यांनी त्यांला हटकवले. यावरून अरोपीने कळकुटे यांच्याशी वाद घातला.

आरोपी मतीन याने काठीने तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. पोलिस शिपाईयांच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्तीव्यवस्थापन कायदा, कोविड १९ उपाययोजना २०२०, साथीचे रोग अधिनियामान्वये गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी, नागरिकांचा एकमेकांशी कमी अंतरावरून संपर्क होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा अहोरात्र प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहे. नारिकांच्या सुरक्षेसाठी झटताना तीन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही पोलिस आपल्या कर्तव्यात कसलाही कसूर ठेवत नाही. अश्या परिस्थितीत पोलिसांवर हल्ला होणे ही दुर्देवी बाब आहे. याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल, असे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.