पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूका वार्ड पद्धतीने घेण्यात येणार

0
604

पिंपरी, दि.२० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूका एक किंवा द्विसदस्यीय पध्दतीने होतील असे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणूका बहूसदस्यीय पध्दतीएवजी वार्ड पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यावर विधानसभेत काल (गुरूवारी) शिक्कामोर्तब करण्यात आला.

यामुळे महापालिकेतील राजकीय समिकरणे बदलू शकतात. बहूसदस्यीय प्रभाग मोठे होते. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढविणे शक्य होत नव्हते. एक वार्ड निवडणूक पध्दतीने महापालिका निवडणूक होणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता निवडणूक लढविणे सोपे जाणार आहे.