पिंपरी चिंचवड मधील दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई

0
562

पिंपरी, दि. २७ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील अविनाश धनवे आणि वाकड परिसरातील अनिकेत चौधरी या दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली आहे. दोन्ही टोळ्यांतील एकूण आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाकड परिसरातील टोळीप्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. थेरगाव), धीरज श्रीकांत शिंदे (वय 22, रा. ताथवडे), अजय सुधाकर शिरसाठ (वय 20, ताथवडे), मयूर शिवाजी बोरकर (वय 23, रा. ताथवडे), समीर बोरकर या पाच जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे अनिकेत चौधरीच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन (मोक्का) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि. 27) मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिघी परिसरातील टोळी प्रमुख अविनाश बाळू धनवे (वय 29, रा. वडमुखवाडी, च-होली बुद्रुक), ऋषिकेश हनुमंत गडकर (वय 23, रा. देहूफाटा, पुणे), जगदीश संजय काकडे (वय 20, रा. आळंदी) या तीन जणांच्या टोळीवरही कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे अविनाश धनवे याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन (मोक्का) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.
त्यावर अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी 22 मे रोजी मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.