पिंपरी-चिंचवड परिसरात चोरीच्या सहा घटना; लॅपटॉप, मोबाईल, रोख रकमेसह दागिने चोरीला…

0
473

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील चिखली, हिंजवडी, सांगवी, देहूरोड आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 25) संबंधित पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सोने, चांदी, डायमंडचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन, सेंट्रिंग प्लेट असा तीन लाख 91 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

योगेश धोंडीबा रामाणे (वय 41, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. 24) रात्री साडेदहा ते सोमवारी (दि. 25) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत फिर्यादी हे त्यांच्या पहिल्या मजल्यावरील खोलीला कुलूप लाऊन झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. खोलीतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 74 हजरांचा ऐवज चोरून नेला.

हिंजवडी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातून 73 हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने, तीन टायटनचे घड्याळ आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 24) दुपारी सव्वा तीन ते पाच या कालावधीत घडला.

शशांक बाजीराव खोत (वय 30, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 25) पहाटे साडेपाच ते सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे पहाटेच्या वेळी कामावर गेले. त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरट्याने ही चोरी केली.

हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रेमशंकर लालबहादूर यादव (वय 24, रा. मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याही खोलीच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि. 25) सकाळी साते ते आठ वाजताच्या कालावधीत घडला.

देहूरोड पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर कुलूप लाऊन बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 69 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

अमोल मधुकर सातपुते (वय 37, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सेंट्रिंगचे काम करतात. सांगुर्डी गावात फिर्यादी यांचे काम सुरु आहे. तिथे त्यांनी ठेवलेल्या 35 हजारांच्या 70 सेंट्रिंगच्या प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना 5 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत घडली.