पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा शब्द भाजपने पाळला – पालकमंत्री गिरीष बापट  

2005

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – भाजपने पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु करण्याचा शब्द दिला होता. तो आम्ही पाळला आहे. शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वातंत्र्यदिनापासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी (दि.१५) सांगितले.  

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कामकाज चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधून स्वातंत्र्यदिनापासून कार्यान्वित करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. तसेच याठिकाणी पालकमंत्री बापट यांनी ध्वजारोहण करुन रेजिस्टरमध्ये सही केली. यावेळी महापौर राहूल जाधव,  खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार  महेशदादा लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, नवनियुक्त पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन,  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे,  पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, चंद्रकांत अलसटवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहारतील वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. सामान्य माणूस आमचा केंद्र बिंदू असल्यामुळे त्याची सुरक्षीतता हे आमचे कर्तवय आहे. यामुळे आम्ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी सदैव त्तपर आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र आयुक्तालय भेटल्याने शहरवासियांचे अभिनंदन केले. जनतेचे काम करणे हेच आमचे प्रथम कतर्व्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोक त्यांच्या समस्या आमच्याकडे घेऊन येण्या आगोदर पोलिस नागरिकांकडे पोहचून त्याचे प्रशन सोडवतील अशा प्रकारचे काम करु असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आमचा रोड मॅप तयार असून तो सांगण्या अयवजी आम्ही कारवाई करुन तुम्हा सांगू असे ही त्यांनी यावेळी नमुद केले. तसेच शहरासाठी नव्याने “फोन ऑफ फ्रेन्ड” हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून त्या क्रमांकावर फोन केल्यास अडचणीत असलेल्या व्यक्तींजवळ पोलिस पाच मिनिटात पोहचतील असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. ट्रॅफीक समस्यांबाबत देखील असाच फोन क्रमांक जहिर करण्यात येणार असून त्या द्वारे जलद गतीने कारवाई होणार आहे. तसेच पोलिसांच्या प्रत्येक उपक्रमात नागरिकांना सहभागी करुन घेणार असल्याची माहिती पद्मनाभन यांनी यावेळी दिली.