पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद

0
717

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) –  रावेत पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक कामे, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कामे, विद्युत विभागातील नियमित दुरूस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी (दि. १३) सायंकाळी  शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि. १४) पाणीपुरवठा अनियमित राहू शकतो, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

दरम्यान, गुरूवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. मात्र, सायंकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.