कासारवाडीतील दोन लहान मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सावत्र आई-वडिलाविरोधात गुन्हा  

0
1193

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – सावत्र आई आणि वडिलांनी दोन लहान मुलांना मारहाण केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये कासारवाडी येथे घडली.

याप्रकरणी मुलांचे आजोबा भिवसन दादाजी कापडनीस (वय ६१ रा. सटाणा, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. तर नूपुर पाटील (वय१०) आणि शिवम (वय ३) अशी मारहाण केलेल्या मुलांची नांवे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील (वय ३८), अश्विनी पाटील (वय ३२. दोघेही रा. नाशिकफाटा, कासारवाडी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नूपुर आणि शिवम यांच्या आईचे निधन झाल्याने ते वडील ज्ञानेश्वर आणि सावत्र आई अश्विनी यांच्याकडे राहतात. दरम्यान या दोघांना नूपुर आणि शिवम यांना फरशी पुसण्याच्या काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी या दोन लहान मुलांनी आपले आजोबा आणि मामा यांना सांगितले.

त्यानंतर आजोबांनी सटाणा येथून पुण्यात येऊन भोसरी पोलीस ठाण्यात सावत्र आई आणि वडील यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.