पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्या व्यवसाय; गुन्हे शाखेने टाकला छापा आणि…

0
252

पिंपरी, दि.१५ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारला. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली. तर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी दुपारी पिंपरी मंडई येथे करण्यात आली.

समोर आलेल्या माहितीवरून, अक्षय शरद भालेराव (वय 23, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक जमीद तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.