पिंपरीत शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा विजयी जल्लोष

0
668

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय झाल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पक्षाच्या मोरवाडी येथील कार्यालयासमोर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना पेढा भरवून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देतानाच कार्यकर्त्यांनी मोरवाडीतील भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर नागरिकांना साखर-पेढे वाटले. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, कैलास बारणे, चंद्रकांत नखाते, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, प्रभाग स्वीकृत विनोद तापकीर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, रामकृष्ण राणे, राजू दुर्गे, शेखर चिंचवडे, पोपट हजारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.