राष्ट्रवादीत राजकीय भूकंप; शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिला पदाचा राजीनामा

0
583

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, तो पक्षश्रेष्ठी स्वीकारणार का?, हे पाहावे लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती. पार्थ पवार हे अजितदादांचे पुत्र आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघाची निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, या निवडणुकीत पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला आहे.

या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, तो पक्षश्रेष्ठी स्वीकारणार का?, हे पाहावे लागणार आहे.