पिंपरीतील दि सेवा विकास बँकेला दाम्पत्याने घातला साडेदहा कोटींचा गंडा

0
4529

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – विवादीत जागा निर्विवादीत असल्याचे भासवून दाम्पत्याने पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेला तब्बल साडेदहा कोटींचा गंडा घातला.

याप्रकरणी राजू सेवाराम तनवानी (वय ५६, फ्लॅट नं.४, गुरुकृपा अपार्टमेंट, पिंपरी चिंचवड लिंक रोड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, सागर सुर्यवंशी (वय ३८) आणि त्याची पत्नी शितल सागर सुर्यवंशी (तेजवानी) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि शितल हे दोघे पती-पत्नी आहेत. त्यांची भागीदारीमध्ये मेसर्स रेणुका लॉन्स नावाची कंपनी आहे. २८ मार्च २०१७ रोजी या दोघांनी फिर्यादी राजू तनवानी यांचा विश्वास संपादन करुन वाकड येथील सर्वे नं. १५३/१ ए मधील प्रत्येकी ३० आर  विवादीत मिळकत निर्वावादीत असल्याचे भासवून तसेच व्यावसायासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तनवानी यांना खोटी माहिती दिली. तसेच ती जागा पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेकडे गहाण ठेवून त्यावर तब्बल साडेदहा कोटींचे कर्ज मंजुर करुन घेत बँकेची फसवणुक केली. सागर आणि शितल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.