गाणे ऐकून खासदार उद्यनराजे झाले भावूक  

0
957

सातारा, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची हटके स्टाईल, आक्रमकपणा, डायलॉगबाजी, देहबोली नेहमीच चर्चेंचा विषय ठरली आहे. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात ते भावूक झाल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल  झाला आहे.  

व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी रचलेले ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणे ऐकवण्यात येते. हे गाणे ऐकताना उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हे गाणे ऐकताना राजेंचे  डोळे अश्रूंनी आले झाल्याचे दिसते. उदयनराजे यांचा कार्यकर्त्यांसोबतचा हा व्हिडीओ  आहे. त्यात  कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाल्याचे दिसत आहेत.