पिंपरीतील कन्या विद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” विविध उपक्रमांनी साजरा

0
461

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयमध्ये सोमवारी (दि. १५) विविध उपक्रमानी “वाचन प्रेरणा दिन”  उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका एस. बी.जाधव, पर्यवेक्षिका एस. एस.पडवाल, ग्रंथपाल डी. के. बावके, शिक्षक- शिक्षकेत्तर, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये प्रथम राष्ट्रपती डॉ.ए .पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यावर आधारित कथाकथान व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनीनीच्या सुप्त गुनाना वाव देण्यासाठी काव्यवाचन, प्रकटवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.

त्याचप्रमाणे वाचन संस्कृतिचे संवर्धन व्हावे यासाठीविद्यालयात ग्रंथप्रदर्शन भरविन्यात आले होते. यामध्ये विविध science विषयक, साहित्यविषयक, कथा, कदंबऱ्या, आत्मचरित्र, थोर सत्पुरुषणची चरित्रे, संदर्भ ग्रंथ, बाल वाडमय, नियतकालिके यांचा समावेश करण्यात आला होता.