नवी दिल्लीत बसपा खासदाराच्या मुलाने महिलेवर ताणली बंदूक

0
647

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) –  बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी खासदार राकेश पांडेच्या मुलाची गुंडगिरी दिल्लीत पाहायला मिळाली. त्याने एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर तरुणीवर बंदूक ताणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना सोमवार (दि.१५) नवी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर घडली.

आशिष पांडे असे बसपाचे माजी खासदार राकेश पांडे यांच्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आशिष पांडे हा एका महिलेसोबत दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलात आला. तिथून निघताना पार्किंगवरुन एका महिलेशी त्याचा वाद झाला. मग पांडेजी थेट गाडीत गेले, आणि घोडा घेऊन आले. महिलेला गोळी मारण्याची धमकी देत त्यांनी शिवीगाळही केली. नशीब म्हणून हॉटेल स्टाफने आशिष पांडेला वेळीच रोखले. खरतर हॉटेल प्रशासनाने या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. आशिष पांडेच्या कर्तबगारीचा व्हिडीओ व्हायरल झाला. तो माध्यमांच्या हाती लागला आणि त्याच्या बातम्या झाल्या. मग पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडीओची सत्यता तपासली. आणि आशिष पांडेविरोधात स्यू मोटो गुन्हा दाखल केला आहे. आशिष पांडेला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक टीम लखनौला रवानाही झाली आहे.