पिंपरीच्या महापौर निवडणुकीतील हुल्लडबाजीचा मातृभूमी दक्षता चळवळीकडून निषेध

0
1574

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड माहापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारात झालेल्या गुलाल उधळण आणि फटाकेबाजीच्या हुल्लडबाजीचा शहरातील मातृभूमी दक्षता चळवळीकडून तिव्र निषेध नोंदवण्यात आला. निषेध नोंदवत असल्याचे निवेदनही त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी महापालिकेच्या २०१२ च्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीदरम्यान पालिकेच्या आवारात कार्यकत्यांनी सुमारे २ तासापैक्षा जास्त काळ फटाके वाजविणे, गुलाल उधळणे, साऊंड सिस्टिम वाजवणे व समुहाने नाचणे आदी कृतीबद्दल संघटनेच्या वतीने प्रशासनाला तीव्र निषेधाचे पत्र दिले होते.

त्यानंतर ऑगस्ट २०१८ च्या निवडणुकीत देखील या सर्व बाबी पुन्हा घडल्या. त्यामुळे या पुन्हा पुन्हा घडणाऱ्या अनुचित घटनांनी पालिका प्रशासन कायदेपालन व जनतेप्रती किती बेजबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महापौर, उपमहापौर निवडूकीत घडलेल्या अनुचित प्रकारबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करावी, असे देखील त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.