पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत सलमान खान चित्रपटाच्या सेटवर पोहचला

0
463

मुंबई, दि.७ (पीसीबी) –  बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान मुंबईच्या मुसळधार पावसात सायकलवर स्वार असल्याचे दिसत आहे. दबंग 3 च्या शुटिंग दरम्यान सलमानने मुंबईतील मुसळधार पावसात सायकल चालवण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी रस्त्यावरील लोकांनी सलमानसोबत सेल्फी काढण्याची हौसही भागवून घेतली आहे.

सध्या सलमान खान आगामी चित्रपट दबंग ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच जयपूर येथील शूटिंग संपवून सलमान मुंबईत परतला होता. चित्रपटाचे राहिलेलं शूटिंग मुंबईत पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली होती. पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत सलमान खान चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर पोहचला आणि चित्रिकरण पूर्ण केलं.

Mumbai city in d rains . . Off to the location to shoot for #dabangg3

सलमान खान याने आपल्य ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये सलमान खान ब्लॅक जॅकेट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. सलमानच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नेटकऱ्यांनी सलमानच्या या युक्तीचं कौतुकही केलं आहे.

सलमानच्या आगामी दबंग ३ चे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. या चित्रपटात सलमान खान शिवाय, सोनाक्षी सिन्हा आणि आरबाज खान आहेत. २० डिसेंबर २०१९ रोजी दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधून महेश मांजरेकर यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.