महाराष्ट्र पोलीस दलात ३४५० जागांसाठी भरती; २३ सप्टेंबर पर्यंत करु शकता अर्ज

0
844

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती जाहीर झाली आहे. ३४५० जागांसाठी ही भरती होणार असून, भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे. भरतीप्रक्रियेला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू आहे. २३ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईसाठी सर्वाधिक १०७६, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक ७२० जागांसाठी भरती होईल.

https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.

गृह विभागाने यंदा पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे होणारी ही पहिली भरती आहे. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

 

अशा आहेत जिल्हानिहाय जागा ?

मुंबई पोलीस भरती – १०७६

पिंपरी चिंचवड पोलीस भरती – ७२०

रत्नागिरी पोलीस भरती – ६६

रायगड पोलीस भरती – ८१

कोल्हापूर पोलीस भरती – ७८

सोलापूर पोलीस भरती – ७६

पालघर पोलीस भरती – ६१

पुणे रेल्वे पोलीस भरती – ७७

पुणे ग्रामीण पोलीस भरती – २१

पुणे पोलीस भरती – २१४

जळगाव पोलीस भरती १२८

सांगली पोलीस भरती – १०५

सातारा पोलीस भरती – ५८

औरंगाबाद पोलीस भरती – ९१

नागपूर पोलीस भरती – २८८

मुंबई रेल्वे पोलीस भरती – ६०

नवी मुंबई पोलीस भरती – ६१

ठाणे पोलीस भरती – १००

धुळे पोलीस भरती – १६

नंदुरबार पोलीस भरती -२५

भंडारा पोलीस भरती – २२

सिधुदुर्ग पोलीस भरती – २१

जालना पोलीस भरती -१४

कोणती कागदपत्र आवश्यक

ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.

तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.

जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार

ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड

डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत

जात प्रमाणपत्र वैधता

सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी