पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून 61 हजारांची फसवणूक

0
228

वाकड, दि. ३१ (पीसीबी) – पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून पतंजली स्टोअर मध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने महिलेची 61 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 10 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता रहाटणी येथे घडली.

जयश्री कैलास डुकळे (वय 30, रा. तापकीरनगर, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना पतंजली स्टोअर, रहाटणी येथे कामाला नेले. दुकानाच्या बाहेर फिर्यादी यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम असा 61 हजार 500 रुपयांचा ऐवज आरोपीने ऑफिसमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने काढून घेत फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.