गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून 85 लाखांची फसवणूक

0
507

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने 85 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2014 ते सन 2019 या कालावधीत हॉटेल रानमळा वाल्हेकरवाडी येथे घडली.

महेंद्र महादू वाघेरे (वय 44, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश पांडुरंग पाळेकर (वय 47, रा. वळवण, लोणावळा, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा जमीन खरेदी विक्री करण्याचे व्यवहार करतो. तुम्ही गुंतवणूक करा, गुंतवणूक केलेल्या पैशाचे दोन ते तीन वर्षांमध्ये दाम दुप्पट रक्कम देतो, असे आरोपीने फिर्यादी यांना आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून 85 लाख रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.