पार्थ मगरला मुलांच्या कॅडेट गटाचे जेतेपद

0
234

मुंबई, दि. 25 (पीसीबी) – मुंबई शहरच्या पार्थ मगरने येथे सुरु असलेल्या ८२व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या कॅडेट गटात विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने पुण्याच्या शौरेन सोमनचा 9-11, 15-13, 11-9, 12-10, 8-11, 11-6 असा पराभव केला. या स्पर्धेचे आयोजन विले पार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.

अंतिम सामन्यात पार्थ मगरची सुरुवात चांगली झाली नाही. त्याला पहिला गेम 9-11 असा गमवावा लागला पण, दुसऱ्या गेममध्ये त्याने पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. यानंतर सलग दोन गेम जिंकत सामन्यात 3-1 अशी आघाडी घेतली. पाचव्या गेममध्ये शौरेन चमक दाखवली पण, सहाव्या गेममध्ये पार्थने खेळ उंचावत गेमसह सामना जिंकला.

उपांत्यफेरीतील सामन्यात पार्थ मगरने पुण्याच्या ईशान खांडेकरचा 11-9, 6-11, 11-4, 9-11, 11-4, 11-9 असा पराभव केला तर, अन्य उपांत्यलढतीत शौरेन सोमनने ठाण्याच्या ध्रुव वसईकरचा 9-11, 14-12, 11-8, 11-4, 11-6 असा पराभव केला.

मुले कॅडेट गट :
उपांत्यपूर्व फेरी :
ईशान खांडेकर वि.वि.कौस्तुभ गिरगावकर 11-8, 11-9, 11-8, पार्थ मगर वि. वि.रामानुज जाधव 11-7, 11-8, 11-8 , ध्रुव वसईकर वि. वि. मयूरेश सावंत 11-8, 11-3, 11-9, शौरेन सोमन वि. वि. प्रतीयुष बाउवा 9-11, 11-4, 11-8,11-8

उपांत्यफेरी :
पार्थ मगर वि,वि.ईशान खांडेकर 11-9, 6-11, 11-4, 9-11, 11-4, 11-9 , शौरेन सोमन वि.वि.ध्रुव वसईकर 9-11, 14-12, 11-8, 11-4,11-6

अंतिम फेरी :
पार्थ मगर वि. वि. शौरेन सोमन 9-11, 15-13, 11-9, 12-10, 8-11, 11-6