निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार नाही, कोण म्हणते वाचा…

0
425

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटलं जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायलयानं घेतला आहे.

कपडे न काढता स्पर्श करण्याचं कृत्य हे लैंगिक अत्याचाराच्या परिभाषेत येत नाही. अशा प्रकारचं कृत्य हे आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत महिलांच्या चरित्र्य हननाचा गुन्हा असू शकतो. त्यामुळं या प्रकारच्या गुन्ह्यांत आरोपीला कमीतमी 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

नागपूरमध्ये 2016 रोजी 39 वर्षीय सतीश नावाचा आरोपी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला सामान देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला. त्यावेळी आरोपीनं मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतीशवर होता. त्यानंतर आरोपी सतीशला पोक्सो कायद्यांतर्गत 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.