पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सतर्क

0
629

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारताने नियत्रंण रेषेपलिकडील (एलओसी) दहशतवादी तळांवर आज (मंगळवार) पहाटे कारवाई केली. त्यानंतर पाककडून आगळीक होण्याची शक्यता असल्याने भारतीय वायूसेना सतर्क  झाली आहे.

भारतीय वायूसेनेने आंतरराष्ट्रीय सीमा, एलओसीशी निगडीत संरक्षण तंत्रज्ञान अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने कोणतीही प्रतिक्रिया दिल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायूसेना सज्ज ठेवण्यात आली आहे.

वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसविण्यात आली. त्यानंतर  जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकले.  या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके मध्ये घुसल्याचे म्हटले आहे.