पर्यटनासाठी भारतात आल्याचे सांगत घातला 58 लाखांचा गंडा

0
165

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – भारतात पर्यटनासाठी आलो असल्याचे सांगून मदतीच्या बहाण्याने एका व्यक्तीला 58 लाख 78 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत फेसबुक आणि ओनलाईन माध्यमातून घडला.

शाम अरविंद ओझरकर (वय 54, रा. पाटीलनगर, बावधन) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. विल्यम अल्बर्ट, 0589200100000661 खातेधारक, 7042136239, 8130318145 या मोबाईल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विल्यम याच्यासोबत फिर्यादी ओझरकर यांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. विल्यम याने तो पर्यटनासाठी भारतात आला असून त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक डॉलर आहेत. त्यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याला ओझरकर यांच्या मदतीची गरज आहे, असे सांगून त्याने ओझरकर यांची दिशाभूल केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल 58 लाख 78 हजार 700 रुपये घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.