पतीचे अगोदर झालेले लग्न समजल्याने पत्नीला मारहाण

0
261

रहाटणी, दि. 17 (पीसीबी) – पतीचे अगोदर एक लग्न झालेले असताना देखील त्याने दुसरे लग्न केले. पहिल्या लग्नाबाबत दुस-या पत्नीला समजल्यानंतर त्याने दुस-या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा छळ केला. ही घटना १ जानेवारी २०१० ते २४ मे २०१९ या कालावधीत घडली.

कैलास वाल्मिक म्हस्के (रा. रहाटणी), शालिनी सिंग (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास आणि फिर्यादी महिला हे पती-पत्नी आहेत. आरोपी कैलास याचे अगोदर एक लग्न झाले आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत. ही बाब फिर्यादी विवाहितेला समजली. त्यावरून कैलास याने विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच आरोपीची मैत्रिण शालिनी सिंग हिने फोन करून फिर्यादी विवाहितेला वाईट वाईट शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.