प्राणीमात्रांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने अंमलात आणला ‘हा’ कायदा

0
256

पिंपरी. दि.१५(पीसीबी) : “प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० (दि प्रिव्हेन्शन ऑफ युएल्टी एनिमल्स अॅक्ट १९६०) हा कायदा प्राणीमात्रांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे क्रूरतेपासुन संरक्षण व्हावे, यादृष्टीकोणातुन भारत सरकारने अंमलात आणला आहे.

पी.एफ.ऐ ही संस्था प्राणीमात्राचे संरक्षण व संवर्धन याकरीता काम करते. सौ.विनीता टंडन या संस्थेच्या पुणे विभागाच्या मुख्य विभाग प्रमुख आहेत. तर अॅड.प्रतिक कुंडलीक गावडे हे सदर संस्थेच्या (पी.एफ अ.) पुणे विभागाचे कायदा सल्लागार आहेत

सौ विनीता टंडन यांनी उपरोक्त कायद्यातील प्राणीमात्रांच संवर्धन व संरक्षण यादृष्टीकोणातुन करण्यात आलेल्या कायदेशीर तरतुदी, नियम, नियमावली, त्याचप्रमाणे गृहरचना संस्यातील पाळीव प्राणी आणि रस्त्यावरच्या प्राण्यांचे नियम याबाबतीत असणारे नियम, नियमावली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची परिपत्रके न्यायालयीन आदेश इत्यादींचे एकत्रित संकलन करून त्याबाबत एक पुस्तक प्रसिध्द केले आहे

सदर पुस्तकाचे माध्यमातुन सर्वसामान्य नागरिक, गृहरचना संस्था, पोलीस अधिकारी इत्यादीना प्राणीमात्रासंदर्भातील कायदे त्याचप्रमाणे प्राणीमात्रासंदर्भात क्रूर वागणूक केल्यास किंवा त्यांचे बाबत कौर्याची कृत्ये केल्यास त्याअनुषंगाने प्राण्यांवरील कुरता प्रतिबंधक अधिनियम १९६० याअन्वये असणारी शिक्षेची तरतूद याबाबतची माहिती सर्वांना मिळणार आहे. सदर पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. याशिवाय सदर कायदयातील काही ठळक उपरोक्त कायदयातील तरतूदींचे अनुषंगाने पोलीस संशोधन केंद्र, पुणे आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक यांचे वतीने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता प्राण्यांवर क्रूरपणा प्रतिबंधित अधिनियम १९६० याबाबत ‘ऑनलाईन’ वेबीनारचे (परिसंवाद) संयुक्त आयोजन दि. ११.१२.२०२० रोजी पुणे येथील पोलीस संशोधन केंद्रामध्ये आयोजित केले होते. सदर परिसवांदाचे आयोजनाकरीता मा.पोलीस उपायुक्त श्री.आनंद भोईटे साहेब, पिंपरी चिंचवड परिमंडळ-१ यांनी सहकार्य केले तसेच सदर परिसंवादाच्या आयोजनाकामी पोलीस समन्वयक व पोलीस निरीक्षक मा.स्मिता वासनिक यांनीही मोलाचे सहकार्य केले.

सदर वेबीनारचे (परिसंवाद) माध्यमातून प्राण्यांवर क्रूरपणा प्रतिबंधीत अधिनियम १९६० यातील कायदेशिर तरतूदी, नियम-नियमावली, सदर कायदयातील ठळक तरतूदी, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्याबाबत क्रूर कृती झाल्यास त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्याबाबतचे मार्गदर्शन व गुन्हयाचा तपास तसेच सदर कायदयातील तरतूदी इत्यादीबाबतचे मार्गदर्शन सौ.विनिता टंडन व अॅड प्रतिक गावडे यांनी केले. याशिवाय सदरप्रसंगी सौ.विनिता टंडन लिखीत प्राण्यांवर क्रूरपणा प्रतिबंधीत अधिनियम १९६० या पुस्तकाचे सादरीकरण करण्यात आले.

सदर ऑनलाईन वेबीनारचे दरम्यान महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सुमारे २२० पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे अन्य पोलीस अधिकारी यांनी त्यांचा सहभाग नोंदविला.