पंतप्रधान मोदी अॅक्शन रुममध्ये; असा ठरला एअर स्ट्राइक 

0
571

नवी दिल्ली , दि. २६ (पीसीबी) – भारतीय वायूसेनेने  पाकिस्तानात घुसून आज (मंगळवार) पहाटे दहशतवाद्यांचे  तळ उद्‌ध्वस्त केले. ही कारवाई  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखी खाली करण्यात आली.  मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर होते,  अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या या हवाई हल्ल्यात  ३२५ दहशतवादी  आणि त्यांना प्रशिक्षण देणारे २५ प्रशिक्षक अशा एकूण ३५० जणांचा खात्मा  झाला आहे. यामध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे.

या कारवाईसाठी  लष्कर आणि वायुसेनेने एलओसीजवळ ड्रोनच्या सहाय्याने  हवाई पाहणी केलीहोती.   या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या  तळाला लक्ष्य बनविण्यात आले.  याबाबतची माहिती  २०  फेब्रुवारीलाच संकलित केली होती. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. त्यानंतर वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला.