पंतप्रधान मोदीच्या घरावर उडत्या तबकडीच्या घिरट्या

0
721

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील घरावर ७ जून रोजी उडती तबकडी घिरट्या घालताना दिसून आले आहे.   त्यानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्यांना संशयास्पद काहीही आढळून आले नाही.  

दिल्लीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण यासंबंधीची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सुरक्षेच्या काराणास्तव त्यांनी माहिती देण्यास नकार दिलाय. ७ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. युएफओचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही सुरू  केली होती.

अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडलेली नाही. २०१७ मध्ये संसदेवर ड्रोन दिसल्याची सुचनाही हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आणि सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.