पंतप्रधानपद माझा अजेंडा नाही, मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील – नितीन गडकरी

0
354

भोपाळ , दि. ६ (पीसीबी) –  पंतप्रधानपदाच्या चर्चेत सतत नांव समोर येत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केला आहे. मी याआधीदेखील अनेकदा स्पष्ट केले आहे की, पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या पदाचे उमेदवार आहेत. यावेळीदेखील तेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले आहे.

नितीन गडकरी   भोपाळमधील एका प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी गडकरी यांना पत्रकारांनी तु्म्ही पंतप्रधानपदाचे दावेदार आहात का? असा प्रश्न केला. यावर गडकरी यांनी पंतप्रधान पद हा माझा अजेंडा नाही, असे स्पष्ट केले.

भाजपने २०१४  च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या होत्या,  त्यापेक्षा जास्त जागा  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल.  विकास हा आमच्या पक्षाचा निवडणुकीचा अजेंडा आहे. त्याच्या जोरावर आम्ही निवडणूक लढत आहोत. देशाला सुपर इकोनॉमिक पॉवर बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत,  असे गडकरी म्हणाले.