इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबर प्लेट, मोफत पार्किंग आणि टोलमाफी; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

0
367

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचाच जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून केंद्र सरकारने अशा वाहनांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यास सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट देण्यात येणार असून या वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. याबाबत केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी देशातील सर्व राज्यांना पत्र लिहून निर्देश जारी केले आहेत.