पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोध असेल – प्रकाश आंबेडकर

0
509

सोलापूर, दि. ९ (पीसीबी) – भाजप विरहित सत्ता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान पदासाठी बसपाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देऊ.  मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांना  कदापी पाठिंबा देणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे  नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोलापूर) येथे स्पष्ट केले. 

आंबेडकर सोलापुरात  पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भाष्य केले. तसेच लोकसभेच्या पाचव्या आणि सातव्या टप्प्यात मोदींना सत्ता हातातून निसटून जात आहे की काय, याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारसभांतून वैयक्तिक टीका करण्यास  सुरूवात केली आहे, असे ते म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेला वंचित बहुजन आघाडी आणि सहकारी पक्ष एआयएमआयएम  सर्व  २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे.  आपला पक्ष कुणाहीसोबत जाणार नाही, मात्र कुणालाही आपल्या पक्षासोबत यायचे असेल,  तर आपल्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले राहतील, असेही त्यांनी स्पष्ट यावेळी केले.