निवडणुका जाहीर झाल्यावर तोफखाना बाहेर काढणार – राज ठाकरे

0
840

पुणे, दि. २३ (पीसीबी) – माझा तोफखाना तयार असून निवडणुका जाहीर झाल्यावर तोफखाना बाहेर काढणार आहे. मी आचारसंहितेची वाटच बघत आहे. त्यानंतर तोफखान्याचा योग्य ठिकाणी वापर करेन, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

कोंढव्यातील दिवंगत राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई-लर्निंग स्कूलचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी राज बोलत होते.  प्रत्येक वेळी बोलायलाच हवे, असे काही नाही. सारखे बोलून लोकांना वीट येतो. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मी पुण्यात येऊन  माझी भूमिका मांडणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले असून त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळेच त्यांना उभा महाराष्ट्र ओळखत आहे, याचा मला अभिमान आहे. मला एकहाती सत्ता द्या, मी चमत्कार घडवून दाखवेन. पुणे महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत, येथेही बदल घडविणे नागरिकांच्या हाती आहे, असेही ठाकरे म्हटले.