नितीन गडकरींना उपपंतप्रधान, तर शिवराजसिंह चौहानांना पक्षाध्यक्ष करा

0
446

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्रिपद देण्यात यावे. तसेच  मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे.  तर पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेवरच ‘फोकस’ करावा ,असे त्यांनी  म्हटले आहे.