निघोजे येथे कंपनीचा पत्रा उचकटून सोळा लाखांची वायर लंपास

0
419

चाकण, दि. १६ (पीसीबी) – तिघांनी मिळून कंपनीचा पत्रा उचकटून कंपनीतील १५ लाख ९९ हजार रुपये किमतीचा कॉपर पाईप आणि हार्ड कॉपर फ्लेक्झिबल केबल चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. १४) सकाळी निघोजे येथे महेंद्रा टॉवर कंपनीतून उघडकीस आली.

याप्रकरणी वसंत साखरलाल सूर्यवंशी (वय ४३, रा. पिंपळे – गुरव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सूर्यवंशी यांची खेड तालुक्यातील निघोजे यथे महेंद्रा टॉवर कंपनी आहे. शनिवारी (दि. १३) रात्री एका महिलेसह तीन चोरटे कंपनीचा पत्रा उचकटून आत घुसले. कंपनीतील हार्ड कॉपर पाईप आणि हार्ड कॉपर फ्लेक्झिबल केबल असा १५ लाख ९९ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करत आहेत.