निगडी, भोसरी, दिघीत विनयभंगाच्या तीन घटना

0
470

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – निगडी, भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यात विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निगडी पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश नामुते (वय 19, रा. अजंठानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडित महिलेचा एक महिन्यापासून पाठलाग केला. मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिलेला त्याच्याकडे बोलावून त्यांच्याशी अश्लील बोलून विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 33 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडित महिलेला वारंवार फोन केले. ‘माझी बहीण पीएसआय आहे. तिच्याकडून तुझे कॉल रेकॉर्ड काढून घेईन’ अशी धमकी देत महिलेला त्रास दिला. वैयक्तिक परिचय वाढविण्यासाठी वारंवार पाठलाग आणि फोन करून विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दिघी पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 32 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडित महिलेचा नातेवाईक आहे. महिलेच्या बहिणीला धमकी दिल्याचा जाब विचारल्यावरून आरोपीने महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेचे कपडे फाडून तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी दिली. फिर्यादी महिलेचा मुलगा आरोपीला समजावण्यासाठी गेला असता आरोपीने त्यालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.